News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

१. मुंबई: आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, दुष्काळ आणि नक्षलवादी हल्ल्यावर चर्चा होणार
२. मसूद अजहरवर बंदी घालण्याच्या घोषणेने काय होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाने दाऊद इब्राहीम, मसूद अजहर आणि हाफिज सईदला भारताकडे तात्काळ सोपवायला हवं: काँग्रेस नेते दिग्विजय सिंह
३. जेटच्या कर्मचाऱ्यांना दिलासा, २०० कर्मचारी आणि ५० वैमानिकांचा एअर इंडियात समावेश होणार
४. नवी दिल्ली: दुसरे पक्ष पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान झाडूलाच करा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं आवाहन
५. नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांमध्ये नक्षली कारवाया ५० ते ६० टक्क्यांनी घटल्या आहेत- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
६. जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये अतिरेक्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला गोळी घातली, जखमी कर्मचारी रुग्णालयात दाखल
७. सांगली: वाळवा तालुक्यातील येडेमच्छिद्र येथे पोलिसांची धाड, १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
८. नवी दिल्ली: पुलवामा, पठाणकोट, उरी आणि गडचिरोली… आणि इतर ९४२ बॉम्बस्फोट… पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तरी कान उघडे ठेवून ऐका, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा टोला
९. जयपूर: पूर्वीच्या सरकारचं कोणी ऐकत नव्हतं, आज जग सुद्धा भारताचं म्हणणं ऐकतं, हा आहे नवा भारत. भारताचं म्हणणं दुर्लक्षित करता येणार नाही, हे आज सिद्ध झालंय- मोदी
१०. आचारसंहितेचा भंग: निवडणूक आयोगाची भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहवर तीन दिवसाची प्रचारबंदी
११. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्यावाः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
१२. फनी वादळाचा फटका, हैदराबादमधील चार जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता शिथील करण्याची आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची मागणी, निवडणूक आयोगाला लिहिले पत्र
१३. नक्षली हल्ल्यानंतर गडचिरोलीत पोलीस आणि जवानांच्या बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ
१४. गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याचा तीव्र निषेध, अशा हिंसाचाराविरोधात संपूर्ण देश कायम एकसंघपणे उभा राहील: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
१५. उत्तर प्रदेश: वाराणसीतून एका जवानाची उमेदवारी रद्द होत असेल तर हे लोक देशभक्तीच्या नावानं मतं का मागत आहेत?, सपा नेते अखिलेश यादव यांचा सवाल
१६. उत्तर प्रदेश: बसपा प्रमुख मायावती आणि सपा नेते अखिलेश यादव यांचा कंट्रोलर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती, मोदी माझ्यावर दबाव टाकू शकत नाहीत- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
१७. नवी दिल्ली: बसपा अध्यक्षा मायावती यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी
१८. लंडन: ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजेला ५० आठवड्याचा कारावास