रमझानमुळे पहाटे पाच वाजता मतदान सुरु करण्याचा न्यायालयाचा सल्ला

रमझानमुळे सकाळी सातऐवजी पहाटे पाच वाजता मतदान सुरु करावे असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. रमझानच्या उपवासामुळे उर्वरित तीन टप्प्यांमध्ये सातऐवजी पहाटे पाचला मतदान सुरू करण्यात यावे अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
५ मेला रमझान सुरु होत आहे. रमझानला मुस्लिम बांधव पहाटे लवकर उठून अन्न ग्रहण करतात. त्यानंतर ते सकाळची प्रार्थना करून झोपी जातात. रणरणत्या उन्हामुळे ते दिवसभर बाहेर पडत नाहीत. ही गोष्ट विचारात घेऊन सात मे १२ मे आणि १९ मेला निवडणूक आयोगाने मतदान पहाटे पाचला सुरु करण्यात यावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने यासाठी योग्य पाऊल उचलावे असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसंच मध्य भारतात उष्माघातामुळे लोकांना बाहेर पडायला त्रास होतो. तेव्हा त्यांचा विचार करूनही पहाटे पाचला मतदान सुरू करावे असंही याचिकाकर्त्यांचे म्हणणं आहे.
ही मागणी पूर्ण झाल्यास भारतात पहिल्यांदाच १२ तास मतदानाची वेळ ठेवण्यात येणार आहे. ५ मे पासून रमझान सुरू होत असून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे.