मोदींच्या विरोधातील माजी सैनिक तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द , न्यायालयात जाण्याचा यादव यांचा इशारा

Samajwadi Party candidate Tej Bahadur Yadav after his nomination from Varanasi parliamentary seat was rejected: We have been told that we did not produce the evidence that was asked from us before 11 am. Whereas, we had produced the evidence. pic.twitter.com/SOkMRcS2BP
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 1, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून न्यायाची लढाई लढणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मागितेलले सर्व पुरावे आम्ही दाखल केले होते, तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे तेजबहादूर यांनी म्हटले आहे. तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे सपा-बसपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदींनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला. तसेच माझी उमेदवारी रद्द करणे चुकीचे असून मी निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संबंधित कागदपत्रे, पुरावे देण्याचे बजावले होते. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रे जमा केले होते. तरीही, आयोगाने माझी उमेदवारी रद्द केली असून हे चुकीचे आहे. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाची लढाई लढणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे.