मनोरंजक : देशातील मतदारांत २७,२८५ मायावती , ७८३ राहुल गांधी आणि २११ नरेंद्र मोदी आहेत !! आणि इतर नेत्यांच्या नावांचे मतदार पहा ….

देशात विविध राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समान नावाचे मतदार असल्याचे निवडणुक आयोगाच्या माहितीतून समोर आले ऑनलाईन लोकमतने हि माहिती शोधून काढलीआहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचे २११ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत या नावांचा समावेश आहे. निवडणुक आयोगाच्या वोटर हेल्पलाइन अॅपनुसार राहुल गांधी हे नाव असलेल्या ७८३ मतदारांची नोंद आहे. एवढच नाही तर, बसपा प्रमुख मायावती यांच्या नावाचे २७,२८५ मतदार देशात आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचे ३४८२ मतदार देशात आहे.
वोटर हेल्पलाइन अॅपवरून माहिती काढली असता, गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावासारखे २३२९ मतदार आहे तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या नावाचे १०१ मतदार असल्याचे समोर आले आहे. भोपाळ मतदार संघातून भाजपच्या उमेदवार असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या नावाच्या उमेदवाराने नुकतीच माघार घेतली आहे, मात्र त्यांच्या नावाचे २०७ मतदार देशात आहे..
पप्पू आणि फेकू हे दोन नाव मागील पाचवर्ष देशाच्या राजकरणात केंद्रबिंदू म्हणून राहिले. देशात पाच लाख नावाने पप्पू मतदार आहेत तर १५२४८ फेकू नावाच्या मतदारांची नोंद आहे. विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नावे इलेक्ट्रॉनिक जाहिरातीत वापरण्यासाठी बंदी घातली होती.