News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

People should not vote for those who think 100 times before saying 'Vande Mataram': Prime Minister Narendra Modi
Read @ANI story | https://t.co/X7KXt9Rqid pic.twitter.com/z5TV1qnY5l
— ANI Digital (@ani_digital) April 29, 2019
1. पंतप्रधान म्हणतात जो वंदेमातरम म्हणण्यापूर्वी १०० वेळा विचा रकरतो त्याला मतदान करू नका.
2. लोकसभा निवडणूकः महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवरील मतदान पूर्ण; चार टप्प्यांत एकूण ६१ टक्के मतदानाची नोंद
3. मुंबई – चौथ्या टप्प्यातील मतदानासह महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया आटोपली, आता प्रतीक्षा 23 मेच्या निकालांची
4. लातूर – विहिरीतील गाळ काढताना गुदमरूम तिघांचा मृत्यू; वडील, मुलगा अन पुतण्याचा समावेश, औसा तालुक्यातील अलमला येथील घटना
5. मुंबईः माटुंग्यातील बिगबाझारला आग लागली. विझवण्यासठी प्रयत्न सुरू. रात्री उशिरा आली आग आटोक्यात.
6. केरळः कासारगोड मॉड्यूल प्रकरणी अबू बकरला अटक; एनआयएची कारवाई.
7. भीमा-कोरेगाव प्रकरण : आरोपी वरवरा राव यांचा जामीन अर्ज पुणे कोर्टाने फेटाळला.
8. माओवाद्यांनी बालाघाट लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व लांजीचे समाजवादी पक्षाचे माजी आमदार किशोर समरिते यांची एसयूव्ही कार अडवून पेटवून दिली.
9. पुणेः जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी यासिन भटकळवर आरोप निश्चित.
10. अहमदनगर: नगर शहरातील व जिल्हयातील ६७ जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई. अनेक जण दोन वर्षांसाठी तडीपार. नगरसेवक श्रीपाद छिंदम तीन महिन्यांसाठी तडीपार.
11. पुणेः सहकारनगर भागात एसबीआय बँकेचे एटीएमफोडुन १० लाखांची रोकड लंपास; पोलिस घटनास्थळी दाखल दाखल.
12. अहमदनगरः शिर्डी विमानतळावर स्पाइस जेटचे विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरले, सर्व प्रवासी सुखरुप
13. पटना साहिब मतदारसंघासाठी काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज भरला
14. एक चुकीचं मत तुमच्या मुलांना चौकीदार बनवु शकतं, नवज्योत सिंग सिद्धू यांची टीका.
15. अहमदनगर: पारनेर तालुक्यातील देसवडे येथील संगिता गेणभाऊ फटांगरे या महिलेचा उष्माघाताने मृत्यू.
16. पंजाब: अभिनेता सनी देओल याने गुरुदासपुरमधून दाखल केला उमेदवारी अर्ज.
17. मध्य प्रदेश: छिंदवाडामधील सौंसर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने ५० वर्षीय मतदान कर्मचाऱ्याचा मृत्यू