” मच्छर को कपडे पहनाना, हाथी को गोद मे झुलाना और तुमसे सच बुलवाना असंभव है नरेंद्र मोदी ” : नवज्योतसिंग सिद्धू

Congress leader Navjot Singh Sidhu in Bhopal: Macchar ko kapde pehenana, haathi ko godh mein jhulana aur tumse sach bulwana asambhav hai Narendra Modi #LokSabhaElections2019 pic.twitter.com/3LduG1AU3s
— ANI (@ANI) April 29, 2019
” मच्छर को कपडे पहनाना, हाथी को गोद मे झुलाना और तुमसे सच बुलवाना असंभव है नरेंद्र मोदी “
राफेल डीलचा मुद्दा मोदींना पराभूत करणार असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विश्वास दाखवताना ‘जर ते अमेठीतून हरले तर मी राजकारण सोडेन’ असे उदगार माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी काढले आहेत. रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवाद शिकायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी सिद्धू यांनी भाजपाकडून काँग्रेसवर वारंवार होत असलेले आरोपही खोडून काढले आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात ७० वर्षात कोणताही आर्थिक विकास झाला नाही या भाजपाच्या आरोपावर सिद्धू म्हणाले, या काळात सुईपासून विमानांपर्यंत ज्या काही वस्तू बनवण्यात आल्या त्या या देशातच आणि काँग्रेसच्याच काळात बनवल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर सोनिया गांधी यांनी पार पाडलेल्या काँग्रेस नेतृत्वाचेही त्यांनी कौतुक केले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया यांनी काँग्रेसचे सक्षमपणे नेतृत्व केले. त्यामुळेच केंद्रात १० वर्षे (२००४ ते २०१४) काँग्रेसची सत्ता कायम राहिली, असे सिद्धू म्हणाले. जो कोणी भाजपाशी प्रामाणिक राहिला त्यालाच केवळ राष्ट्रवादी मानलं गेलं मात्र, ज्यांनी त्यांचा पक्ष सोडला ते त्यांच्यासाठी देशद्रोही ठरले, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला. असल्याचे ते यावेळी म्हणाले.