मतदान करायचे होते कन्हैयाला , अधिकाऱ्यांनी द्यायला लावले गिरिराजला : महिलेचा आरोप

https://youtu.be/76pS8CmUFjk
बिहारमधील बेगुसराय येथे आपण ईव्हीएमवरील एक नंबर (कन्हैय्या कुमार) बटण दाबणार होतो, पण जबरदस्ती करत दुसऱ्या क्रमांकाचं (गिरीराज सिंह) बटण दाबायला लावलं असा आरोप एका महिलेने केला असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला आपल्याला जबदस्तीने गिरीराज सिंह यांना मतदान करायला लावलं असा आरोप करत आहे.
बेगुसराय मतदारसंघातून कन्हैय्या कुमार आणि गिरीराज सिंह पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. गिरीराज सिंह यांना भाजपाने नवादा येथून उमेदवारी न देता बेगुसराय येथून निवडणूक लढण्यास पाठवलं आहे. दुसरीकडे सीपीआयने कन्हैय्या कुमारला उमेदवारी दिली आहे.
हा व्हिडीओ बभनगावा पंचायत येथील एका मतदान केंद्रावरील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओत महिला जोरजोरात ओरडून आपल्यावर मतदानासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचं सांगत आहे. मला एक नंबरचं बटण दाबायचं होतं, पण जबरदस्तीने दोन नंबरचं बटण दाबायला लावलं असं महिला सांगत आहे.