‘एक्स्पायरी बाबू पी एम’ नरेंद्र मोदी प्रचार करीत आहेत कि , घोडेबाजार ? ४० सोडा एक सल्लागारही तुमच्याकडे येणार नाही : तृणमूल काँग्रेस

तृणमूल काँग्रेसचे चाळीस आमदार आमच्या संपर्कात आहेत फोडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना तृणमूलचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी कडक उत्तर देताना म्हटले आहे कि , या सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली असून मोदी असे बोलून मोदी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने घोडेबाजार करीत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आम्ही मोदींविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असेही ब्रायन यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढारी म्हटले आहे कि , तृणमूलचे ४० आमदार सोडा, तुमच्यासोबत एक सल्लागारही येणं कठीण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील सभेत बोलताना ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट केला होता. मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या यावक्तव्याला डेरेक ओ ब्रायन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.