आम्ही कधीही मोदींना “नीच” म्हटले नाही , उलट त्यांना आम्ही “उच्च ” जातीचे मानतो : मायावती

कन्नौजच्या सभेमध्ये मोदींनी आम्ही (मायावती आणि अखिलेश) त्यांना ‘नीच’ म्हटल्याचा आरोप केला आहे . वास्तविक आम्ही त्यांना कधीही असे म्हटले नाही . त्यांचा आरोप पूर्णतः निराधार आहे असा खुलासा बसपा नेत्या मायावती यांनी केला आहे . या उलट आम्ही त्यांना उच्च जातीचे संबोधून त्यांचा सन्मानाचं केला आहे .
त्यांच्या मागासवर्गीय असण्याच्या चर्चेबद्दल मायावती म्हणाल्या कि, वास्तविक गुजरातमध्ये त्यांची जात उच्चवर्णीयांमध्ये येते परंतु राजकीय फायद्यासाठी त्यांनी ते मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या जातीचा समावेश ओबीसीमध्ये करून घेतला.
निवडणूक लागल्या आणि प्रचार सुरु झाला कि मोदी लगेच मागासवर्गीय तर कधी चहावाले, सर्वसामान्य, गरीब घराचे होऊन जातात आणि सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळवतात तर राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांचा उल्लेख नामदार म्हणून करतात. या शिवाय मोदींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विरोधक त्यांच्या विषयी जे बोलत नाहीत ते सुद्धा विरोधक बोलल्याचे ते बिनधास्तपणे सांगतात, मायावती यांचा खुलासा हा त्याचाच एक भाग आहे.