News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 29 एप्रिलला मतदान. चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; महाराष्ट्रात मावळ, शिरुर, नाशिक आणि मुंबईतील सहाही मतदारसंघात होणार 29 एप्रिलला होणार मतदान.
2. औरंगाबाद: चिथावणीखोर व्हिडीओ प्रसारित करून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अपक्ष उमेदवार आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात पोलिसांनी नोंदविला अदखल पात्र गुन्हा.
3. दिल्लीः जेट एअरवेजचे कर्मचारी आणि कुटुंबीयांचे जंतर मंतर येथे मेणबत्त्या पेटवून आंदोलन .
4. नवी मुंबई – कामोठ्यामध्ये शेकापच्या कार्यकर्त्याला मतदारांना पैसे वाटप करताना पकडले .
5. भंडारा : पवनी तालुक्याच्या अड्याळमध्ये भरधाव ट्रकची टाटा सुमोला धडक; दोन ठार, दोन गंभीर.
6. मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून आतापर्यंत १० कोटी ५१ लाख रुपयाची रोकड़ जप्त, आयकर विभागाक़डून तपासणी सुरु,आचारसंहिता उल्लंघन क़ेल्याप्रकरणी १७ गुन्हे दाखल, ३९१ अवैध शस्त्र जप्त
7. पुणेः सिंहगडावर आज सकाळी व्यायामासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, यशोधन नाटेकर (वय ४१)असे या तरुणाचे नाव
8. मुंबईः प्रवाशांच्या चेक इन चे सॉफ्टवेअर बिघाडामुळे एअर इंडियाच्या जगभरातील १४९ विमानाना सरासरी ११७ मिनिटे विलंब. मुंबईतील ४० उड्डाणाना ४० मिनिटे ते साडे तीन तासाचा विलंब
9. औरंगाबादचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअसवर, ६१ वर्षांपूर्वीच्या रेकॉर्डची बरोबरी. २६ एप्रिल १९५८ रोजी नोंदविले गेले होते ४३.६ अंश सेल्सिअस तापमान. उद्या पारा ४४ वर जाण्याची शक्यता
10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही कधीही नीच म्हटले नाही तरी राजकीय फायद्यासाठी ते उच्चवर्णीय असतानाही स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेतात. गुजरातमध्ये त्यांची जात उच्चवर्णीयांच्यामध्ये येते परंतु ते मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या जातीचा समावेश ओबीसीमध्ये करून घेतला. : मायावती