News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

१. उद्धव ठाकरे आज वाराणसीत, मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना राहणार उपस्थित
२. मुंबईः सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणा-या नराधमाची फाशी कायदेशीर त्रुटींमुळे मुंबई हायकोर्टाकडून रद्द
३. पनवेलः वाजपेयींच्या अंत्ययात्रेचे फोटो मोदींच्या रॅलीसाठी वापरले – राज ठाकरे
४. ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त व्हायला नको का? – नरेंद्र मोदी
५. पीएम नरेंद्र मोदी बायोपिक 19 मे पर्यंत प्रदर्शित न करण्याची निवडणूक आयोगाची भूमिका
६. राज्यात १ हजार ३८१ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. परंतु, योग्यवेळी उपचार मिळाल्याने त्यापैकी १ हजार ६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
७. अहमदनगरः मी राधाकृष्ण विखे पाटील नाही, तुम्ही चुकीच्या माणसाला बोट लावलय. माझ्या नगरच्या उमेदवारीला विरोध करून चूक केलीत आता त्याची परतफेड तर करावीच लागेल- डॉ. सुजय विखे यांचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना इशारा
८. राजुरातील पीडित मुलींच्या पालकांबाबत वक्तव्याबद्दल अट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा
९. १९९३ च्या मुंबई सिरियल बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू
१०. दिग्विजय सिंह ‘दहशतवादी’, साध्वी प्रज्ञा सिंहांचे पुन्हा वादग्रस्त विधान
११. औरंगाबाद: शरणापूर परिसरात धावत्या रेल्वेसमोर प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.
१२. गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या डिव्हिजनल कमिटीचे सदस्य असलेल्या दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण, दोघांवर होते 18 लाख 50 हजारांचे बक्षीस
१३. जालना : कुमार जुंझुर या युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या; किल्ला जिनिंग परिसरात आढळला मृतदेह.