धक्कादायक : प्रज्ञासिंग पाठोपाठ आणखी एक दहशतवादाचा आरोपी विश्र्व हिंदू परिषदेच्या तिकिटावर !!

धक्कादायक वक्तव्य
“कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला कुठेही मृत्यू आल्यास त्यांना शहीद म्हणता येत नाही. केवळ स्वातंत्र्य सैनिक आणि सैनिकच शहीद होतात. पोलिसवाले कधीच शहीद होत नसतात…”
मालेगाव बॉम्बस्फोटातील खटल्यात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पाठोपाठ या स्फोटातील आणखी एक आरोपी मेजर रमेश उपाध्यायही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. उपाध्यायने हिंदू महासभेच्या तिकीटावर उत्तर प्रदेशातील बलिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर त्याने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं. ‘कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला कुठेही मृत्यू आल्यास त्यांना शहीद म्हणता येत नाही. केवळ स्वातंत्र्य सैनिक आणि सैनिकच शहीद होतात. पोलिसवाले कधीच शहीद होत नसतात,’ असं धक्कादायक वक्तव्य उपाध्यायने केलं आहे.
काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्या आदेशाननुसारच आमच्यावर कारवाई केली जात होती, असा आरोप करतानाच त्यावेळी नोकरशाही काँग्रेसची गुलाम बनली होती, अशी टीकाही त्याने केली.