Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी सरकार जावे म्हणून “तो” युवक झाला अर्धनग्न !! पवारांच्या सभेत येऊन दिले निवेदन ….

Advertisements
Advertisements
Spread the love

आपली बाजू जगासमोर मांडण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही . याच मालिकेत एक वेगळा प्रकार  जिल्ह्यातील एका युवकाने केला आहे . त्याने भीष्म प्रतिज्ञा  केली आहे कि ,  जोपर्यंत मोदी सरकार जाणार नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही. येवला तालुक्यातील कृष्णा डोंगरे  या युवा कांदा उत्पादकाने बुधवारी निफाड येथे राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर हि प्रतिज्ञा केली आहे.

Advertisements

त्याचे असे झाले कि , दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी शरद पवार उभे राहताच गर्दीतून कृष्णा डोंगरे हा युवा कांदा उत्पादक व्यासपीठावर चढला. कांद्याला भाव मिळत नसल्याने अर्धनग्न आंदोलन करत असल्याचे त्याने सांगितले. पिंपळगाव येथे झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊ नये म्हणून आदल्या दिवशीच पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले. सभा झाल्यानंतर आपली सुटका करण्यात आली.

Advertisements
Advertisements

जोवर हे सरकार बदलणार नाही, तोवर शर्ट घालणार नसल्याचे डोंगरे यांनी सांगितले. पवार यांना त्याने निवेदनही दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबंधिताला दिलासा देत २६ मेनंतर आपण तुला शर्ट पाठवू, असे सांगितल्यानंतर डोंगरे खाली उतरले. दरम्यान, या सभेत पवार यांनी कृषिमालास भाव नसल्याने आणि त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याने २०१७-१९ या कालावधीत राज्यात ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. नाशिकमध्ये सभा घेऊनही ते द्राक्ष, कांदा प्रक्रियेबाबत काहीही बोलले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता येते. शेतमालास भाव नसेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, याकडे पवार यांनी लक्ष वेधत आपल्या कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळात कृषिमालास चांगला भाव मिळण्यासाठी घेतलेले निर्णय कथन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!