Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती। जनता के सामने, चौकीदार मक्कारी नहीं चलती। : राहुल गांधी

Spread the love

Rahul Gandhi

अदाकारी नहीं चलती।

जनता के सामने, चौकीदार
मक्कारी नहीं चलती।

अशा शब्दात राहुलगांधी यांनी अक्षय कुमारला नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीची थट्टा उडविली आहे. ट्विटरवर हा हल्ला करताना राहुल गांधी यांनी शेवटी ‘चौकीदार चोर है’ हा हॅशटॅगही वापरला आहे. बॉलिवूड ‘खिलाडी’, अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी मोदींच्या व्यक्तिगत जीवनापासून ते त्यांच्या आवडीनिवडीपर्यंतचे प्रश्न विचारले होते. आज ही मुलाखत सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच राहुल यांनी मात्र ट्विटरवरून खास शेरोशायरीतून मोदींवर टीका केली आहे. ‘हकीकत रूबरू हो, तो अदाकारी नहीं चलती. जनता के सामने, चौकीदार…मक्कारी नहीं चलती.’ असं ट्विट करून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींची मुलाखत म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून निव्वळ अभिनय आहे. पण आता लोकांसमोर त्यांचा हा अभिनय जास्तकाळ टीकणार नाही, असंच राहुल यांना या शेरोशायरीतून म्हणायचं आहे. शिवाय त्यांनी ‘चौकीदार चोर है’ हा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही या मुलाखतीवर घणाघाती टीका केली आहे. अक्षयकुमारने मोदींची घेतलेली मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित करार आहे, अशी टीका शर्मा यांनी केली. तर मोदींनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी. शेतकरी अभिनेत्यांप्रमाणे खूशमस्करी करणारे प्रश्न विचारत नाहीत, असा टोला काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदींना लगावला आहे. उत्तर प्रदेशातील एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हा टोला हाणला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!