News Update : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. लोकसभेच्या निवडणुका हा कुंभमेळ्यासारखाच मोठा उत्सव: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेलाही मतदान करू नका – राज ठाकरे
3. कोल्हापूर : विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारा मुख्य संशयित हरीश विजयकुमार स्वामीचा मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
4. नागपूरः लाच प्रकरणात अटकेतील रजत सुभाष ठाकूर हा सीताबर्डी पोलिस स्टेशनमधून पसार; १५ हजारांची लाच घेताना एसीबीने केली होती अटक
5. अभिनेता सनी देओलला भाजपची उमेदवारी जाहीर, गुरुदासपूरमधून निवडणूक लढणार
6. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात दोन ते तीन अंशांनी तापमानवाढीचा अंदाज
7. अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे गोठ्याला लागलेल्या आगीत २९ जनावरांचा होरपळून मृत्यू, गायी, शेळ्या, बकऱ्या, कालवडी, वासरे यांचा समावेश. पशुपालक अंबादास खेमनर यांचे सुमारे सुमारे १० लाखांचे नुकसान
8. बेकायदा होर्डिंगच्या प्रश्नावर शिवसेना, काँग्रेस आणि बसपला मुंबई हायकोर्टाची ‘कारणे दाखवा’ नोटीस
9. मुंबई – महिलांचे अश्लील फोटो बनवून ते सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या कक्ष – ९ ने केली अटक
10. मध्य प्रदेश: साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला रोड शोदरम्यान काळा झेंडा दाखवला म्हणून भाजप कार्यकर्त्यांची एनसीपी कार्यकर्त्याला मारहाण
11. कोल्हापूर : एचडीएफसी बँकेच्या शाहुपूरी शाखेवर ६७ लाखांचा ऑनलाईन दरोडा. अर्बन बँकेच्या खात्यावरील रक्कम
12. २००२ गुजरात दंगल: सामूहिक बलात्काराची पीडिता बिल्किस बानो हिला ५० लाख रुपये नुकसान भरपाई, नियमानुसार सरकारी नोकरी आणि घर द्या – सुप्रीम कोर्टाचे गुजरात सरकारला आदेश