मोदींनी उत्तर प्रदेशातील 22 कोटी जनतेचा विश्वासघात केला – मायावती

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील 22 कोटी जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप मायावतींनीनरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
मायावती ट्विटरवर म्हणाल्या, ‘उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरुन- फिरुन तेच सांगत आहेत की, उत्तर प्रदेशने मला देशाचा पंतप्रधान बनवले. हे खरे आहे मात्र त्यांनी उत्तर प्रदेशच्या २२ कोटी जनतेचा विश्वासघात का केला? उत्तर प्रदेश ज्याप्रमाणे त्यांना पंतप्रधान बनवू शकतात त्याप्रमाणे पदावरुन हटवू देखील शकतात. त्याची पूर्ण तयारी झाल्याचे दिसत आहे.
याचबरोबर, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ ऐकून स्वार्थापायी स्व:ताच्या जातीस मागास म्हणून घोषित केले आहे. मात्र बीएसपी-सपा-आरएलडी यांनी लोकांच्या मनाचे ऐकले, समजले आणि त्यांचा सन्मान करुन जनहित आणि देशहितासाठी महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला. ज्याचा आनंद जनतेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपाला झालेले दु:ख स्पष्ट दिसत आहे’