ज्याला फायदा व्हायचा त्याला होऊ द्या, राहुल गांधी यांचा संबंध नाही : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. त्यानंतर मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करत आहे का, अशी चर्चा होत असताना राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत, अशीही चर्चा सुरू झाली. याबाबत आता राज ठाकरे यांनी स्वत: खुलासा केला आहे.
‘मी राहुल गांधी यांच्या संपर्कात नाही. मोदी-शहा यांना घालवणं हेच माझं उद्दिष्ट आहे. माझ्या भूमिकेचा कुणाला फायदा होत असेल तर होऊद्या,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.