News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : दुपारनंतरच्या महत्वाच्या बातम्या

1. औरंगाबादः भाजप प्रदेशाध्य आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, ऊन लागल्याने गेल्या सोमवारपासून औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते
2. लोकसभा निवडणूकः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू, मुंबईहून देवगिरी एक्स्प्रेसने नांदेडला रवाना
3. मुंबईः माहीममध्ये काळा -पिवळ्या टॅक्सीतून विविध देशांचे सुमारे तीन कोटी रुपयांचे चलन जप्त, दोघांना ताब्यात घेतले. निवडणूक पथकाची कारवाई
4. औरंगाबाद: अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. नईमोद्दीन रफिक शेख याचा जामीन अर्ज फेटाळला
5. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यावेळी ते भाजपचे स्टार प्रचारक असतील. त्यांनी आता ताकाला जाऊन भांडे लपविण्यापेक्षा लवकर निर्णय घ्यावा ही अपेक्षा – शिवाजी कर्डिले, आमदार, भाजप
6. अहमदनगरः आम्ही विखेंसोबत राहावे की काँग्रेससोबत, कर्जत तालुक्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडून मागविले मार्गदर्शन, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविले पत्र
7. औरंगाबादः काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री अनिल पटेल यांची नियुक्ती
8. आसाम : आपले मत देशाची दशा आणि दिशा ठरवणार आहे; यावेळी आपले मत, आसामच्या प्रत्येक शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी जोडणार आहे: नरेंद्र मोदी
9. उत्तरप्रदेश : रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांच्या रोड शो दरम्यान लोकांची गर्दी
10. वाशीत पादचारी पुलाचा भाग कोसळला; दोघेजण जखमी
11. औरंगाबाद: दोन शिक्षिकांचे मंगळसुत्र दुचाकीवर आलेल्या चोरट्यानी पळवले; गारखेडा आणि शास्त्रीनगर येथील घटना.