अखेर नमो टिव्ही पाठोपाठ आता ‘कन्टेट’वरही निवडणूक आयोगाची बंदी

नमो टीव्हीच्या प्रक्षेपणापाठोपाठ आता या टीव्हीवरील कंटेन्टवरही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. या टीव्हीवरील कोणताही कंटेन्ट प्रसारीत करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कमिटीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तसे आदेशच आज निवडणूक आयोगाने दिले आहेत.
नमो टीव्हीविरोधात निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलले आहेत. भाजपच ही टीव्ही चालवत असल्याचं सांगतानाच टीव्हीवरील कंटेन्टवर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्याचे आदेश देण्यात आल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. नमो टीव्हीवरील कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रक्षेपणास बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेलवरील कोणत्याही कंटेन्टचं प्रसारण पूर्व प्रमाणपत्र घेण्यात आलेलं नाही. या चॅनेलवरील कंटेन्ट राजकीय असून ते आचारसंहितेच्या अंतर्गत येत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या चॅनेलवर प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही कंटेन्टसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणं बंधनकारक असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे.
निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी सर्वच डिश टीव्हीवर नमो टीव्हीचं प्रसारण केलं जात आहे. या चॅनेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा चोवीस तास दाखविण्यात येत असल्याने निवडणूक आयोगाने त्याला हरकत घेतली आहे.