Gujrat : क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष अल्पेश ठाकोरसह दोन आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्यातील राधनपूरमधील काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांच्यासह आणखी दोन आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. अल्पेश ठाकोरबरोबर राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये धवलसिंह ठाकोर आणि आमदार भरतजी ठाकोर यांचा समावेश आहे अल्पेश ठाकोरला लोकसभा निवडणूक लढवायची होती. परंतु त्यांना काँग्रेसनं तिकीट दिलं नाही. त्यांच्याऐवजी जगदीश ठाकोर यांना तिकीट देण्यात आल्याने ते पक्षावर नाराज झाले होते.
असे सांगण्यात येते कि , अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसकडे साबरकांठा लोकसभा जागेची मागणी केली होती, पण त्याकडेही काँग्रेसनं दुर्लक्ष केलं. अखेर त्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश हे काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, काही महिन्यांपासून ते पक्षातील नेतेमंडळींवर नाराज होते. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश यांनी सेनेची बैठक बोलावली होती. तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या अफवा पसरविण्यात येत आहेत. शुक्रवारी याबाबत मोठी घोषणा करणार आहे. तेव्हाच पुढील निर्णय सांगेन. यावर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना ठाकोर यांच्याशी चर्चा झाली का, असे विचारले असता त्यांनी हे ठाकोर यांनाची विचारा असे सांगितले.