चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघात ४५३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी 453 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
चौथ्या टप्प्यासाठी 17 मतदारसंघात मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नंदूरबार मतदारसंघ-14, धुळे-37,दिंडोरी-17, नाशिक-32, पालघर-21, भिवंडी-22, कल्याण-36, ठाणे-29, मुंबई उत्तर-22, मुंबई उत्तर-पश्चिम-27, मुंबई उत्तर पूर्व-30 मुंबई उत्तर-मध्य-27, मुंबई दक्षिण-मध्य-30, मुंबई दक्षिण-17, मावळ-33, शिरुर-27 आणि शिर्डी मतदारसंघात 32. चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. चौथ्या टप्प्यातील अर्जांच्या छाननीनंतर अर्ज माघारी घेण्याची मुदत 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.