Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांज लंडन पोलिसांकडून अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक करण्यात आली आहे. इक्वेडोरच्या लंडन येथील दुतावासातून त्याला अटक करण्यात आली आहे. आपली अटक टळावी या उद्देशाने असांज याच दुतावासात वास्तव्य करत होता. इक्वेडोरने त्याला देण्यास नकार दिला. त्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली. विविध देशांची, राजकारण्याची माहिती, कागदपत्रे, संभाषण असांजने जाहीर केले होते. त्यामुळे त्याला अटक व्हावी यासाठी अनेक मंडळी प्रयत्नात होती. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisements

असांजला अटक करण्यात आली असून त्याला वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे हजर करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. असांजने २०१० मध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केली होती. आपली अटक टळावी म्हणून तो २०१२ पासून इक्वाडोर येथील दुतावासात वास्तव्य करत होता. १२ डिसेंबर २०१८ ला त्याला इक्वाडोरचे नागरिकत्व मिळाले होते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!