५६ इंच छातीच्या मोदींसमोर उद्धव ठाकरेंनाही चढले स्फुरण , शरद पवार , राहुल गांधी यांची केली ऐशी तैशी !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील सभा मोदींच्या सैन्याच्या नावावर मते मागितल्याने तर गाजलीच पण या सभेत जणू ५६ इंच छातीच्या मोदींसमोर उद्धव ठाकरेंनाही इतके स्फुरण चढले कि , त्यांनी अक्षर शः शरद पवार , राहुल गांधी यांची ऐशी तैशी केली !! संरक्षण खात्याचे भूखंड खाणारे, गोवारींना गोळ्या घालणारे, वसंतराव नाईकांच्या पाठीत खंजिर खुपसणारे, शर्मा बंधूंना आपल्या हेलिकॉप्टरमधून फिरवणारे शरद पवार तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालणार आहेत का?, असा जाहीर सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पवारांवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथे उद्धव यांची प्रचारसभा झाली. या सभेत उद्धव बोलत होते.
अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. त्यावर राष्ट्रवादीने केलेल्या टीकेलाही उद्धव यांनी प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादीने गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजपला पाठिंबा दिला होता, असे नमूद करत तेव्हा भाजपच्या तंबूत तुम्ही झाडलोट करायला गेला होता का?, असा प्रतिसवाल उद्धव यांनी केला.
राहुल यांच्यावर उद्धव घसरले
राहुल गांधींवर टीका करताना उद्धव यांचा तोल गेला. नालायक कारटं, जीभ हासडून हातात देईन, असे शब्द वापरत त्यांनी राहुलना लक्ष्य केले. राहुल यांच्या ‘गरिबी हटाव’च्या घोषणेवर तोफ डागताना याची सुरुवात तुझ्या आजीबाईंनी केली. त्याने तुमची गरिबी हटली पण लोकांच्या ती पाचवीलाच पुजलेली आहे. एकदा लोकांना फसवलंत आता पुन्हा फसवू नका, असा सल्लाच उद्धव यांनी राहुलना दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर म्हणून आमच्या दैवताचा अपमान करशील तर जीभ हासडून हातात देईन, असा इशाराही उद्धव यांनी राहुल यांना दिला.