News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. ठाणे :भिवंडी साईबाबा नाका परिसरात कारमधून 3 लाख 74 हजार हस्तगत; आचारसंहिता अधिकाऱ्यांची कारवाई
2. मध्य प्रदेश- सीबीडीटीच्या छाप्यात सापडले 281 कोटी
3. बीड : बस स्थानकसमोर वाहतूक शाखेच्या तपासणीत एका कारमध्ये ४० लाख रुपये आढळले, पोलिसांचा पुढील तपास सुरू
4. काबूल – अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्यानंतर तुंबळ चकमक; 99 दहशतवादी ठार, 12 सैनिकांचा मृत्य
5. दिल्ली- भाजपा अध्यक्ष अमित शहांनी घेतली ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणींची भेट
6. अहमदनगर – विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, 12 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांची नगरला सभा
7. भंडारा : निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे पोस्टर लाऊन आवाहन करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा
8. सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातुन 6 जणांनी घेतली माघार, 31 उमेदवार निवडणूक रिंगणात
9. धुळे – आमदार अनिल गोटेंची भाजपाला सोडचिठ्ठी, मंगळावरी धुळे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार
10. औरंगाबाद : काँग्रेसवर आरोप करीत आमदार अब्दुल सत्तार यांची लोकसभा निवडणुकीतून माघार, अपक्ष भरलेला अर्ज मागे घेतला.
11. पश्चिम बंगाल: सर्जिकल टेपने मोदींचे तोंड बंद करा; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र
12. कोल्हापूरः मटका अड्ड्यावर धाड टाकायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर घेऊन पलायन
13. गडचिरोली: अहेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ‘विजय संकल्प सभा’
14. अहमदनगर: नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करणारे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर कारवाई करावी; राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी
15. कोल्हापूरः शिरोली नाक्यावर ६३ लाखांची रोकड जप्त; पोलिसांच्या तपासणी पथकाने केली कारवाई
16. मुंबई: दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.
17. औरंगाबाद: धुणी-भांड्याचे काम करणाऱ्या १७ वर्षीय मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एकास भंडारा जिल्ह्यातून अटक आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी.
18. औरंगाबाद: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १० दिवस खोलीत डांबून बलात्कार, आरोपी नंदू शेलार याला साथीदारासह अटक.
19. औरंगाबाद: काँग्रेसचे बंडखोर अब्दुल सत्तार यांचा उमेदवारी अर्ज मागे, १५ एप्रिल रोजी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार पुढील भूमिका.
20. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत ७ जणांची माघार, अजूनही १९ उमेदवार रिंगणात.
21. पुणे: महात्मा जोतीराव फुले यांच्या १९२व्या जयंतीनिमित्त येत्या गुरूवारी (११ एप्रिल) भिडेवाडा ते समताभूमी अशी शोभा यात्रा काढणार, युवा माळी संघाच्या अध्यक्ष सुनीता भगत यांची पत्रकार परिषदेत माहिती.
22. मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार प्रिया दत्त यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.