कोट्यवधी खर्च करून पुतळे आणि स्मारके उभी केले जातात मग आमच्याविषयीच आकस का ? मायावती यांचे न्यायालयात शपथपत्र

उत्तर प्रदेशातील स्वत:च्या पुतळ्यांबाबत बसपा प्रमुख मायावती यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून उत्तर दिलं आहे. मायावती यांनी त्यांचे वकील शैल द्विवेदी यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. देशात पुतळे बसविण्याची परंपरा जुनीच आहे. स्मारक उभारणं, पुतळे बसवणं ही गोष्ट नवीन नाही. काँग्रेसच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी सरकारी तिजोरीतूनच जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे पुतळे उभारले होते. या पुतळ्यांबाबत मीडिया आणि याचिकाकर्त्यांनी कधीच प्रश्न का उपस्थित केले नाहीत?, असा प्रश्न उपस्थित करून भगवान प्रभू रामचंद्राचा २२१ फुटाचा पुतळा उभारण्यात येत आहे, त्यांच्या पुतळ्याला विरोध होत नाही, मग माझा पुतळा का नाही चालत? असा सवालही मायावती यांनी केला आहे. यावेळी त्यांनी देशात अनेक माजी पंतप्रधानांचे पुतळे उभारण्यात आल्याचंही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
प्रतिज्ञा पात्रात त्यांनी पुढे म्हटले आहे कि , गुजरात सरकारने सरदार पटेलांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारला आहे. त्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मुंबईतही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारही प्रभू रामचंद्राचा पुतळा उभारणार आहे. त्यासाठी भूसंपादन, डिझाइन डेव्हल्पमेंट आणि प्रकल्प अहवालावरच केवळ २०० कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. गुजरात सरकारने सरदार पटेलांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारला आहे. त्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारही प्रभू रामचंद्राचा पुतळा उभारणार आहे. त्यासाठी भूसंपादन, डिझाइन डेव्हल्पमेंट आणि प्रकल्प अहवालावरच केवळ २०० कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
लखनऊमध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि आंध्रप्रदेशात वाय. एस. राजशेखर रेड्डींचा पुतळा उभारण्यात आला आहे. कर्नाटकात मांड्या येथे माँ कावेरीचा ३५० फूट उंच पुतळा बसविण्यात येणार आहे. अमरावतीत एनटी रामाराव यांच्या पुतळ्यावर १५५ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. चेन्नईत मरीना बीचवर जयललिता यांच्या पुतळ्यावर ५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे, याकडेही त्यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. दलित, आदिवासी जनतेच्या सेवेसाठी मी अविवाहित राहिले. या समाजाच्या उत्थानासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझं जीवन मी समर्पित केलं. त्याबदल्यात लोकांनी भरभरून प्रेम केलं. लोकांची इच्छा होती, म्हणूनच तत्कालिन सरकारने माझे आणि हत्तीचे पुतळे उभारले, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बसपाचे माजी प्रमुख दिवंगत कांशीराम यांना भारत रत्न पुरस्कार मिळावा ही जनतेची इच्छा होती, जनतेच्या इच्छांचं प्रतिक म्हणूनच त्यांचाही पुतळा उभारण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.