Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनातून १ कोटी ८ लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ !!

Spread the love

अरुणाचल प्रदेशमधील पासीघाटी येथे पंतप्रधान मोदींची सभा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यात १ कोटी ८ लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली असून, भारतीय जनता पक्ष अरुणाचल प्रदेशात पैसे देऊन मते विकत घेत आहे, असा सनसनाटी आरोप करत काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत आरोप करताना कांग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पैसे पकडल्याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला. हा ‘कॅश फॉर व्होट घोटाळा’ असल्याचा आरोप करताना, ‘हा काळा पैसा आहे का?’, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. इतका पैसा आला कुठून?, असा सवाल करत, ‘यावरून चौकीदार चोर आहे, हे सिद्ध होत नाही का?’, अशा शब्दात सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री खांडू आणि पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला.

मुख्यमंत्री खांडू यांच्या ताफ्यात पैसे मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला नको का, त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असे प्रश्न सुरजेवाला यांनी उपस्थित केले. या प्रकरणी मुख्यमंत्री खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली.

निवडणूक आयोगाचे अधिकारी हे पैसे मोजतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेस्ट हाऊसमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमधून हे पैसे जप्त करण्यात आले. या दरम्यान एकूण ५ गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. या पैशांचा वापर पंतप्रधान मोदी यांच्या सभेत होणार होता का, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!