Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu Kasmir : सीआरपीएफच्या ताफ्याजवळ आणखी एका कारचा भीषण स्फोट

Advertisements
Advertisements
Spread the love

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर बनीहाल येथे सीआरपीएफचा ताफा जात असताना कारमध्ये स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्याची घटना ताजी असताना हा स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कार स्फोटावेळी सीआरपीएफची वाहने कारपासून काही अंतरावर होती. मात्र, एका बसचे किरकोळ नुकसान झाल्याचे सीआरपीएफकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडून हिंदुस्थानाी सुरक्षा दलाला नेहमीच लक्ष्य केले जात आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यामुळे पुन्हा पुलवामासारखाच हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे का याबाबतचा तपास सुरू आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!