Loksabha 2019 : काँग्रेसला मिळाली उर्मी !! उर्मिला मातोंडकर आखाड्यात , गोपाळ शेट्टीच्या विरोधात लढणार

उर्मिला मातोंडकरच्या निमित्ताने जणू काँग्रेसला “उर्मी ” मिळाली असून दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिलाची लढत असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी उर्मिलानं पक्षप्रवेश केला होता. बॉलिवूडमधून राजकारणात एन्ट्री करणाऱ्या उर्मिलाला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल, असं सांगितलं जात होतं. आज त्यावर शिक्कामोर्तब झालं. काँग्रेसनं तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात तिची लढत असणार आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. आता काँग्रेसनं उर्मिलाला रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली आहे. काँग्रेसने तिचे तिकीट तडका फडकी जरी केले आहे.