आपापल्या धर्मीचे पालन हा बाबासाहेबांनी दिलेला अधिकार मग संघाने दरी कायम निर्माण करावी : दिग्विजय सिंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेल्या संविधानात प्रत्येकाला धर्माचं पालन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असं असताना RSS लोकांमध्ये दरी का निर्माण करते ? देशाची एकता आणि अखंडता हीच आपली शक्ती आहे. ती कायम ठेवली पाहिजे, असे काॅंग्रेसनेते दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. सत्य सांगायला मोदी घाबरतात. त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची वैवाहिक माहिती दिलेली नाही. त्यांची शैक्षणिक माहितीही त्यांनी लपवली आहे. त्यांनी ही माहिती सांगावी. त्यात काय अडचण आहे, असं सांगतानाच सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा कोणताही वाद नाही. आरएसएस जर हिंदूंची संघटना असेल तर मी सुद्धा हिंदूच आहे. तरीही माझ्याशी दुश्मनी का?, असा सवालही दिग्विजय सिंह यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी हा सवाल केला. आरएसएस राजकीय संघटना नाही. ती सांस्कृतिक संघटना आहे. संघ नोंदणीकृतही नाही. मग संघाने नाराज का व्हावं? असं सांगतानाच मी द्वारिका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा १९८३ पासूनचा शिष्य आहे. मी माझ्या धर्माचे ढोल बडवत नाही आणि त्याचा निवडणुकीसाठी वापरही करत नाही, असंही दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं.