VBA : वंचित आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचाराची खुलताबादेतून सुरुवात

‘एमआयएम’कडून आमदार इम्तियाज जलील यांची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या प्रचारास गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. ते खुलताबाद येथून प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद विमानतळावर स्वागत करून मंगळवारी आमदार जलील यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठरल्यानुसार, वैजापूर, गंगापूर, कन्नड, वाळूज आदी भागात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतल्या. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडूनही ‘एमआयएम’ पदाधिकाऱ्यांसह मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘एमआयएम’चे चिन्ह पतंग मिळणार असल्याची माहिती खासदार ओवेसी यांनी आमदार इम्तियाज जलील यांना दिली.