आता मायावती यांच्यावरही येतोय बायोपिक : विद्या बालनची भूमिकेसाठी चाचणी

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर येणाऱ्या बायोपिकनंतर आता बसपा अध्यक्ष मायावतींवर बायोपिक येणार असल्याची चर्चा आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन मायावती यांची भूमिका साकारणार आहे. ‘जॉली एलएलबी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर मायावती यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. मायावतीच्या भूमिकेसाठी ७-८ अभिनेत्रींच्या नावांचा विचार सुरू होता, मात्र या भूमिकेसाठी विद्या बालनच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा आहे.
चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे नाव काय असेल किंवा चित्रीकरणाला कधीपासून सुरुवात होईल या गोष्टी अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.