#RBI : रविवारी ३१ मार्चलाही चालू राहतील बॅंका

चालू आर्थिक वर्षाचा शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मार्च येत्या रविवारी येत असला तरी. भारतीय रिझर्व्ह बँकेने कामकाजासाठी देवाण-घेवाण करणाऱ्या देशभरातील सर्व सरकारी बँका रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरबीआयने एक परिपत्रक काढून सर्व सरकारी बँकांना तसे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व पे अँड अकाऊंट कार्यालय सुरू राहणार असल्याने ३१ मार्च २०१९ रोजी सर्व सरकारी बँका सुरू ठेवण्यात याव्यात असं म्हटलं आहे. या बँकाच्या शाखांमधील देवाण-घेवाणीचे व्यवहार ३० मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच RTGS आणि NEFT सहित इलेक्ट्रॉनिक देवाण-घेवाणही ३० आणि ३१ मार्च रोजी वाढवण्यात आलेल्या वेळेपर्यंत सुरू राहणार असल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.