News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 15 One Line News

1. तामिळनाडूमध्ये खासगी इमारतीच्या मलनिस्सारन टाकीमध्ये गुदमरून सहा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू
2. औरंगाबाद: पडेगाव येथील मदरसामध्ये २० विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा. उपचार सुरु
3. भाजपचे राजस्थानमधील नेते घनश्याम तिवारी, सुरेंद्र गोयल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
4. नागपूर लोकसभा मतदार संघात आज छाननीनंतर ३३ उमेदवारी अर्ज वैध; तर रामटेक लोकसभा मतदार संघात २० अर्ज वैध
5. सांगलीसाठी कॉँग्रेसकडून मुदतवाढ; आमदार सतेज पाटील यांनी घेतली खासदार शेट्टी यांची भेट
6. माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना गद्दारीची किंमत मोजावी लागणार; महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य
7. उस्मानाबाद: संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
8. परभणी: बोगस कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेण्याचे प्रकरण; गंगाखेड साखर कारखान्याचे मालक, रासप नेते रत्नाकर गुट्टेंना अटक
9. मुंबई: मराठा आरक्षणावरील सुनावणी अखेर पूर्ण; न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला, मे महिन्यानंतर निकाल येण्याची शक्यता
10. उत्तर प्रदेश: रिपब्लिकन पार्टीकडून (आठवले) १५ उमेदवारांची यादी जाहीर; पक्षाने भाजपकडे केली होती दोन जागांची मागणी
11. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशप्रक्रियेस स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार
12. बीड: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा पाऊस; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ७९ उमेदवारी अर्ज दाखल
13. इचलकरंजी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेची दुसरी जागा न मिळाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसोबत राहणार नाही, खासदार राजू शेट्टी यांची भूमिका, सांगली किंवा शिर्डीसाठी आग्रही
14. मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिवंगत माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे चिरंजीव नावेद अंतुले उद्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार
15. गडचिरोली : पोलिसांनी उधळला घातपाताचा डाव, नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला 5 किलोचा भुसुरुंग केला निकामी