Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : भाजपची ४८ उमेदवारांची घोषणा , महाराष्ट्रातील जागांची मात्र प्रतीक्षा. 

Spread the love

आयपीएलः सलामीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बेंगळुरू संघाची दाणादाण, चेन्नईसमोर ठेवले ७१ धावांचे लक्ष्य

भाजपची ४८ उमेदवारांची घोषणा , महाराष्ट्रातील जागांची मात्र प्रतीक्षा.

>> घोषित जागांमध्ये गोवा ,मध्य प्रदेश ,झारखंड , गुजरात, हिमाचल प्रदेश ,कर्नाटक या लोकसभेच्या ४८ जागांसह गुजरात आणि गोवा विधानसभेच्या ५ जागांचा समावेश आहे .
>> प्रमुख उमेदवारांमध्ये जयंतसिन्हा- हजारीबाग,अर्जुनमुंडा-खुंटी, विद्युत वरण महातो-जमशेदपूर, पशुपतीनाथसिंग-धनबाद, अनुरागठाकूर-हमीरपूर, हिमाचल, सुरेशकश्यप-सिमला, कृष्णकपूर-कांग्रा, निशिकांतदुबे-गोड्डा, झारखंड आदींचा समावेश आहे.
>> ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नेमणूक, लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

>> माजी न्यायमूर्ती पिनाकी घोष यांनी आज भारताचे पहिले लोकपाल म्हणून घेतली शपथ

>> महाराष्ट्रात काँग्रेस २४ जागा लढवणार, राष्ट्रवादी काँग्रेस २० जागा, बहुजन विकास आघाडी १, स्वाभिमानी शेतकरी संघटना २ जागा तर युवा स्वाभिमानी पक्ष १ जागेवर लोकसभा निवडणूक लढवणार

>> जातीयवादी विचारांना रोखण्यासाठी आमचे प्रयत्नः अजित पवार

>> व्हाइस ॲडमिरल कर्णबीर सिंह होणार नवे नौदलप्रमुख; सध्याचे नौदलप्रमुख ॲडमिरल सुनील लांबांच्या निवृत्तीनंतर घेणार पदभार; केंद्र सरकारने केली घोषणा; ॲडमिरल लांबा ३१ मे २०१९ रोजी होणार निवृत्त

>> काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे फक्त खासदार आहेत. मग त्यांच्या संपत्तीत ९ कोटींहून अधिकची वाढ कशी झाली?, भाजपचा सवाल

>> उस्मानाबादः खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी न दिल्याचा निषेध म्हणून उमरगाचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले राजीनामा देण्याच्या तयारीत

>> कोथरूड येथे यशवंतराव नाट्यगृहामध्ये काम चालू असताना अंगावर पत्रे पडून विजय महाडिक (रा. धनकवडी) वय ४५ या पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

>> औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तनवादी संघटनांनी क्रांती चौकात एकत्र येत केला लोकशाही मूल्यांचा जागर

>> जनतेच्या आग्रहास्तव शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची घोषणा

>>  भाजपचे विद्यमान खासदार, अभिनेते परेश रावल लोकसभा निवडणूक लढणार नाही

>> माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा तुमकूर मतदारसंघातून लढणार

>> माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जयकुमार गोरे यांची कराडमध्ये बैठक सुरू. गोरे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत.

>>  प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री सपना चौधरी काँग्रेसमध्ये दाखल.

>> उस्मानाबाद : विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या एका समर्थकाकडून उमरगा येथे आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर ओतून घेतले रॉकेल

>> भाजपात बंडखोरी : शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष लढणार

आपलं सरकार

Click to listen highlighted text!