News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्याने देशभरात राजकीय वादळ .
2. पाकिस्तानी राष्ट्रीय दिवसाच्या नवी दिल्लीतील कार्यक्रमाला काश्मीरी फुटीरतावाद्यांची अनुपस्थिती. भारतीय अधिकाऱ्यांचाहीबहिष्कार.
3. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या हुर्रियत नेता यासिन मलिकच्या संघटनेवर बंदी.
4. उमेदवार निश्चितीसाठी भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक सुरु; नरेंद्र मोदी, शहा उपस्थित.
5. लोकसभेसाठी उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार रणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा.
6. पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर; नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर.
7. समन्यायी पाणी वाटपाबाबत कायद्याच्या माध्यमातून संघर्ष करीत जलसाक्षरता वाढवण्याचा अॅड. प्रदीप देशमुख यांचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन.
8. भंडारा जिल्ह्यात चुलत आजोबांनी लादले नातीवर मातृत्व, १४ वर्षीय नातीने दिला लाखनी येथील रूग्णालयात मुलाला जन्म; ५५ वर्षीय आजोबाला अटक.
9. उमरखेड शहरात सोमवारी शौचास गेलेल्या मुलीची अपहरणानंतर बलात्कार करून हत्या. मृतदेह विहिरीत फेकला.
10. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर परभणीत मेघना बोर्डीकर यांची माघार. शिवसेनेचे लोकसभा उमेदवार संजय जाधव यांच्या मार्ग सुकर.
11. माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजपमध्ये हालचालींना वेग . रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा रात्री होण्याची शक्यता; धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्या नावाचाही विचार सुरु
12. नागपूर लोकसभा मतदार संघातून ९ तर रामटेकमधून दोन उमेदवारांचे अर्ज दाखल
13. पीएम नरेंद्र मोदी चित्रपटासाठी कोणतेही गीत लेखन केले नाही, गीतकार जावेद अख्तर यांची ट्विटरवर माहिती; चित्रपटाच्या श्रेयावलीत जावेद अख्तर यांचे नाव
14. गांधीनगर आडवाणींच्या यशाचे अमित शहाच होते शिल्पकार : प्रकाश जावडेकर
15. पुलवामा हल्लाः ‘जैश’ दहशतवादी सज्जाद अटकेत