भाजपची ३६ जागांची यादी घोषित : महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश , पुण्याहून गिरीश बापट, सोलापूरहून सिद्धेश्वर स्वामी, दिंडोरी : भारती पवार

भाजपची ३६ जागांचीयादीघोषित.
भाजपने रात्री उशिरा महाराष्ट्रातील उर्वरित सहा जागांसह ओरिसा, आसाम , आंध्र प्रदेश ३६ जागांची उमेदवारी घोषित केली आहे. याशिवाय आंधप्रदेश ( ५२ ) ,ओरिसा (२२) , आणि मेघालयातील सेल्सला येथील पोटनिवडणुकीत एका उमेदवारासह विधानसभा उमेद्वारांचीही यादी घोषित केली.
यामध्ये बहुचर्चित पुण्याची उमेदवारी गिरीश बापट यांना प्रदान करण्यात आली तर संबित पात्रा पुरी ओरिसा येथून लढणार आहेत. महाराष्ट्रातील इतर उमेदवार असे आहेत.
जळगाव : स्मिता उदय वाघ,
नांदेड: प्रताप पाटील चिखलीकर,
दिंडोरी :डॉ. भारती पवार
पुणे: गिरीशबापट,
बारामती : कांचन राहुल कुल ,
सोलापूर: डॉ.जयसिद्धेश्वर स्वामी
काँग्रेसची सातवी यादी घोषित
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची आपली सातवी यादी जाहीर केली असून यात ३५ उमेदवरांचा समावेश आहे. या यादी नुसार रेणुका चौधरी तेलंगणातील खम्मम, इम्रान प्रतापग्रही राज बाबीबर यांना देण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील मुरादाबादहून, प्रीता हरित उत्तर प्रदेशातील आग्रा येथून तर राज बब्बर यांना उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्रि येथे मतदार संघ बदलून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेस ने ओरिसा येथील विधानसभेच्या निवडणुकीसाठी ५४ उमेदवारांची यादीहि आज घोषित केली आहे .