News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

1. हिंगोलीतील एनएसजी कमांडोचा हरयाणात मृत्यू

2. अर्नाळाच्या समुद्रात ५ जणांचा बुडून मृत्यू

3. कागजीपुरा येथे औरंगाबादचे तीन युवक तलावात बुडाले; एकाचा पाण्यात बुडून मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश

4. पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला दणका, आझम पानसरेंच्या पुत्राचा राष्ट्रवादीत प्रवेश.

5. काँग्रेसकडून आंध्र प्रदेशमधील 3 लोकसभा आणि 45 विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर

6. लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, गांधीनगरमधून अडवाणींना अडवले.

7. जनरल व्ही. के. सिंह गाझियाबाद, अभिनेत्री हेमा मालिनी मथूरा, तर साक्षी महाराज उन्नावमधून निवडणूक रिंगणात

8. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी अमेठीमधून निवडणूक लढवणार

9. दिलीप गांधी, सुनील गायकवाड या विद्यमान खासदारांचा पत्ता कट, भाजपकडून अहमदनगर दक्षिण आणि लातूरमध्ये नवीन चेहऱ्यांंना संधी

10. भाजपची उमेदवारी न मिळाल्याने खासदार दिलीप गांधी समर्थक नाराज

11. डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचा दौरा सुरू; श्रीगोंदयानंतर पाथर्डीत बैठक, भाजपच्या नेत्यांच्याही भेटीगाठी

12. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांचे निधन

13. रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर स्वीकारणार असतील तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे – रामदास आठवले

14. इराकः जहाज बुडून ५५ जणांना जलसमाधी

15.  धवलसिंह मोहिते-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!