लोकसभा २०१९ : आम्ही आमच्या नावापुढे चौकिदार लीहिले तुम्ही “पप्पू” लिहा…

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना ‘चौकीदार चोर है’ ची घोषणा देतात. त्यांच्या या घोषणेला उत्तरादाखल मोदींकडून ‘मैं भी चौकीदार’ ही घोषणा देण्यात येत आहे. दरम्यान, हरयाणाचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपा नेते अनिल विज यांनी नाव न घेता काँग्रेस नेत्यांनाही आपल्या ट्विटर हँडलचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही आमच्या नावाच्या आधी चौकीदार लिहिले आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हीही आपल्या नावाआधी पप्पू लिहू शकता, असा टोला त्यांनी लगावला आहे.
विज यांनी ट्विट करत काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, आम्ही आमच्या नावाआधी ‘चौकीदार’ लिहिले, याचा तुम्हाला त्रास होत आहे. तुम्हीही आपल्या नावाआधी ‘पप्पू’ लिहा. आम्हाला काहीच आक्षेप नाही. नुकताच पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर आपल्या नावा आधी चौकीदार लिहिले आहे. त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी आणि समर्थकांनीही आपल्या नावाआधी चौकीदार लिहून मोदींच्या मोहिमेचा हिस्सा बनले आहेत.
Very useful, informative….
Thanks . Keep in Touch..