News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या : आज अर्जुन खोतकर यांचा निकाल

१. औरंगाबादेत आज सकाळी ११ वाजता जालन्याच्या जागेबाबत उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे, खोतकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
२. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध केली असून या यादीत केरळमधील १२, उत्तर प्रदेशमधील ७, छत्तीसडमधील ५, अरुणाचल प्रदेशमधील २ आणि अंदमान आणि ३. निकोबारमधील एक अशा एकूण २७ उमेदवारांचा समावेश आहे. चौथ्या यादीमध्ये ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांना तिरुवनंतपुरम येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांना अरुणाचल प्रदेश पश्चिम येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
४. मुंबई: ग्रँट रोड येथे महापालिकेचे ६ कंत्राटी कामगार नाल्यात गुदरमले, एका कामगाराचा मृत्यू
५. ज्यांना अत्यंत महत्वाच्या कागदपत्रांचे संरक्षण करता येत नाही, ते देशाचे संरक्षण काय करणार? भारतीय राज्यघटना बदलण्याचा घाट घातला जातोय, तो हाणून पाडला पाहिजे – शरद पवार
६. संभाजी ब्रिगेडने माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर पंढरपूरमधील पदाधिकारी किरणराज घाडगे यांच्या घराची पोलीसांकडून झडती. पोलिसांच्या मदतीने सरकारची दडपशाही, ब्रिगेडचा आरोप
७. शिवसेनेतून बाहेर पडलेले श्रीगोंदा येथील घनश्याम शेलार यांचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
८. बारामती येथील ‘मोक्का’तील फरारी आरोपी लोकेश परशुराम माने याला अटक; कोतवाली पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी पाठलाग करून पकडले
९. नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे इच्छुक उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
१०. लोकसभेसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाची पहिली यादी जाहीर, ४५ उमेदवार रिंगणात तर महाराष्ट्राला १ जागा