अखेर अर्जुन खोतकर यांनी नांगी टाकली , मेळाव्यात घोषणा होईल : मुख्यमंत्री

अखेर अर्जुन खोतकर यांची तलवार म्यान…
दानवे -खोतकर वाद मिटला असून युतीच्या मेळाव्यात याची घोषणा होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद
फडणवीस यांनी सांगितले.
यासंदर्भात आता स्वत: अर्जुन खोतकर काय सांगतात हे लवकरच समजेल.
गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरु होता. यामुळे खोतकर चांगलेच चर्चेत आले होते. दानवे – खोतकर यांच्यात मध्यस्थी करूनही खोतकर ऐकण्यास तयार नव्हते . खोतकर यांची माघार भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा होता. या बाबत ऊद्धव ठाकरे यांनी खोतकर यांना आवरावे अशी गळ नागपूर महामेळाव्यात मुख्यमंत्री आणि नितिन गडकरी यांनी घातली होती. त्यानुसार काल अर्जुन खोतकर यांना मातोश्रीवर बोलावून त्यांचे कान टोचले होते. त्यामुळे खोतकर माघार घेणार हे स्पष्ट झाले.
आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यासंबंधीचा अधिकृत जाहीर करण्यात येईल असे ठरले आणि तसे झाले. दरम्यान हा निर्णय खोतकर यांना मान्य असेल का ? हे त्यांच्याच तोंडून ऐकावे लागेल. शिवाय इतके पाणी वाहून गेल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने नाराज खोतकर आणि त्यांचे कार्यकर्ते दानवेंना मदत करतील का ? हाही एक प्रश्नच आहे.