लोकसभा २०१९ : काँग्रेसच्या “चौकीदार चोर है “घोषणाला मोदींचे प्रत्युत्तर ” ‘हा, मैं भी चौकीदार हूँ'”

काँग्रेसने दिलेल्या ‘चौकीदार चोर हैं’ या तीन शब्दांच्या घोषणेने ट्रस्ट झालेल्या मोदींनी #MainBhiChowkidar या टॅगलाईन ने काँग्रेसच्या घोषणेला उत्तर दिले आहे . किंबहुना ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीमच मोदींनी आपल्या ट्विटर अकौंटवरून सुरू केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , ‘तुमचा चौकीदार इथे उभा आहे आणि देशाची सेवा करतोय. पण, मी एकटा नाही. भ्रष्टाचार, अस्वच्छता, सामाजिक तेढ याविरोधात लढणारा देशातला प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणतोय – मी पण चौकीदार’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. या मोहिमेसाठी ‘हा, मैं भी चौकीदार हूँ’ हे गाणंही तयार करण्यात आलं आहे.