Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माजी मंत्री एकनाथ खडसे अजूनही स्वप्नांच्या दुनियेत ….मुलांनाही स्वप्न बघण्याचा सल्ला !!

Advertisements
Advertisements
Spread the love

मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं त्यामुळे अनेकांची झोप उडाली असं म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यार्थ्यांना मोठं होण्याचं स्वप्न बघा असा सल्ला दिला आहे. भुसावळ येथे एका शालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात खडसे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Advertisements

प्रत्येकाने स्वप्न पहाणं अत्यंत गरजेचं आहे. स्वप्न अशी पहायची की भल्याभल्यांच्या झोपा उडाल्या पाहिजेत. मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोपा उडाल्या असं खडसे यांनी बोलून दाखवलं. भुसावळ येथील नाहाटा विद्यालय या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि गुरूनाथ फाऊंडेशनतर्फे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात खडसे यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली.

Advertisements
Advertisements

काही दिवसांपूर्वीच जळगाव येथील सावदामध्ये एक शाम नाथाभाऊ के नाम हा मुशायराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातही खडसे यांनी आपण मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिल्याने अशी अवस्था झाल्याचं म्हटलं होतं. या पाठोपाठ आता त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवं होतं ही खदखद बोलून दाखवली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!