धनंजय मुंडे यांचे मोदींना ट्विट , मोदींचे धन्यवाद आणि पुन्हा मुंडेंचे रिट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मै भी चौकीदार ही नवी मोहीम सुरु केली. या मोहिमेची विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली आहे. तरीही नरेंद्र मोदी यांनी धनंजय मुंडे यांना धन्यवाद म्हटलं आहे.मै भी चौकीदार या मोहिमेची खिल्ली उडवत धनंजय मुंडे म्हणतात,
हजारो कोटींचा चुना लावून काही घोटाळेबाज देशाबाहेर पळाले. हे सरकार आणि त्यांनी केलेल्या काही करारांमध्ये घोटाळे झाल्याचा संशय आहे. तरीही स्वतःला देशाचे चौकीदार म्हणून घेणारे पंतप्रधान म्हणतात सारं काही आलबेल आहे. त्यांनी असं म्हणून चौकीदारचं काम करणाऱ्या माणसालाच बदनाम केलं आहे. आता चौकीदाराचं काम करणारा माणूसच मोदींना म्हणतो आहे मै भी चौकीदार मुझे बदनाम ना करो…असा ट्विट धनंजय मुंडे यांनी केला.
ज्यावर @narendramodi या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून धनंजय मुंडेंना धन्यवाद देण्यात आले आहेत. तुम्ही “मै भी चौकीदार या मोहिमेला पाठिंबा दिलात त्याबद्दल तुमचे आभार” असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे. या ट्विटचीही खिल्ली उडवताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे ,कि ४० पैसे रोजाने आणलेल्या लावारीसांवर जबाबदारी टाकली की हे असे होतं. यांना शालजोड्याने हाणलं तरीही धन्यवाद म्हणतात. मोदी शेठ अशा लोकांवर अवलंबून रहाता म्हणून तुमची नाचक्की होते. जरा आवरा, स्वतःला सावरा किती तो मोठेपणा करणार? जरा ट्विट व्यवस्थित वाचा असा खोचक सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
दरम्यान धनजंय मुंडे यांनी “मै भी चौकीदार ” घोषणेची खाल्ली उडवीत महाराष्ट्र सरकार मधील मंत्र्यांनाही टार्गेट केलेआहे तर मुख्यमंत्र्याच्या एकाजाहिरातीचीहीखिल्ली उडविताना म्हटले आहे कि, यांना नारळ व हळद यातला फरक कळत नाही. फक्त फोटोशॉप वापरून विकासाचा महापूर निर्माण केला जातोय. शेतकरी पार देशोधडीला लागलाय. बजरंग बाप्पांसारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्या, तरच आपला बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल.