लोकसभा २०१९: मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यांत मतदान होणार आहे. मतदान होणाऱया दिवशी संबंधित मतदार क्षेत्रात एक दिवसाची भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत जर एखाद्या आस्थापनेला पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे बंधनकारक असणार आहे. मतदानासाठी जर सुट्टी अथवा सवलत न दिल्याने मतदान करता आले नाही अशी तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यांत मतदान होणार आहे. 11, 18, 23 आणि 29 एप्रिल असे मतदानाचे चार टप्पे आहेत. या मतदानाच्या दिवसांत संबंधित ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत जर पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे बंधनकारक असणार आहे.