ज्या दिवशी संविधान धोक्यात येईल त्या दिवशी भीमा कोरेगाव घडेल : चंद्रशेखर आझाद

भारताचे संविधान ज्या दिवशी धोक्यात येईल, त्या दिवशी भीमा कोरेगावची पुनरावृत्ती करू, अशा इशारा भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात बहुजन हुंकार रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. मतदान करण्यापूर्वी रोहित वेमुलाच्या हौतात्म्याची आठवण ठेवा. ऊना हिंसाचार, २ एप्रिल या घटना विसरता कामा नयेत. आपल्या लोकांवर कोणी गोळीबार केला, त्याला बगल देत मतदान करणार का, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. अत्याचार करणारा कायम अत्याचार करत राहतो. मनुवादाचे पुरस्कर्ते कधीही तुमचे भले होऊ देणार नाहीत. गरज पडल्यास कोरेगाव-भीमाची पुनरावृत्ती केली जाईल. आत्ता त्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या दिवशी भारतीय संविधान धोक्यात आहे, असे वाटेल, त्या दिवशी भीमा कोरेगावची पुनरावृत्ती करण्यात येईल, असे आझाद म्हणाले.