Current News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर , अखेर पवारांनी पुरवले नातवाचे लाड !!

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली असून यात मावळ मतदार संघातून पार्थ पवार , दिंडोरीतून धनराज महाले, शिरूरमधून अमोल कोल्हे, बीडमधून बजरंग सोनावणे, समीर भुजबळ नाशिक मतदारसंघातून. अखेर पवारांनी नातवाचे लाड पुरवले आहेत . राष्ट्रवादीने आतापर्यंत 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नगर आणि माढा या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दलचा अद्याप तोडगा निघालेला नाही. आज शुक्रवारी अन्य 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नगर आणि माढा या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दलचा अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या यादीत नगर आणि माढाच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पवार यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली.