Lok Sabha 2019 : महाराष्ट्रातील पाच नावे घोषित, काँग्रेसची २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

आज काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील २१ जागांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीतील बहुसंख्य मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत त्या उमेदवारांची आज प्रामुख्याने घोषणा करण्यात आली. या यादीत ४ मुस्लिमांना स्थान देण्यात आले असून ९ आरक्षित जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मिळून एकूण २१ उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त आणि मिलिंद देवरा हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने आधी उत्तर प्रदेशमधील पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या नावाचा समावेश होता. आता उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. यात प्रिया दत्त, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रिय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि माजी केंद्रिय मंत्री मिलिंद देवरा यांचे नाव आहे. तसेच भाजप सोडून पुन्हा घरवापसी करणारे नाना पटोले यांना नागपूरहून तिकीट देण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सामील झालेल्या सावित्री फुले यांना पक्षाने बहराईचमधून उमेदवारी जाहीर केली आहे.
संपूर्ण यादी
नागपूर- नाना पटोले, गडचिरोली -डॉ. नामदेव उसेंदी, मुंबई उत्तर-मध्य-प्रिया दत्त, मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा, सोलापूर- सुशीलकुमार शिंदे, या महाराष्ट्रातील उमेदवारांसह उत्तर प्रदेशातील १६ उमेदवारांमध्ये ऊमावतीदेवी जाटव , मुरादाबाद – राज बब्बर, खेर – जफर अली नकवी, सीतापुर – कैसर जहां , मिसारिखा – मंजिरी राही , मोहनलालगंज-रमाशंकर भार्गव, सुलतानपूर-डॉ. संजय सिंग, प्रतापगड- रत्ना सिंग, कानपूर-श्रीप्रकाश जयस्वाल, फतेहपुर-राकेश सच्चान, बहराईच- सावित्रीबाई फुले , संत कबीर नगर -परवेझ खान , बंसगाव – खुश सौरभ, लालगंज- पंकज मोहन सोनकर, मिर्झापूर- ललितेश पती त्रिपाठी, रॉबर्टसगंज-भगवती प्रसाद चौधरी अशा २१ उमेदवरांचा या यादीत समावेश आहे .