Loksabha 2019 : त्यांना विचारा किंवा, रोजगाराचे आणि १५ लाखांचे काय झाले ? : प्रियंका गांधी

प्रेम आणि शांती हा या देशाचा सर्वभावे असताना देशात नफरतीची भावना रुजवली जात आहे. शेतकरी , तरुण, महिला आणि श्रमिकांनी या देशाला घडविले आहे म्हणून यावेळी अत्यंत जागृत राहून मतदान करा. त्यांना प्रश्न विचारा किंवा, १५ लाखांचे काय झाले ? रोजगाराचे काय झाले ? असे आवाहन गुजरात मधील आपल्या पहिल्याच भाषणात प्रियंका गांधी यांनी केले.
आज (मंगळवारी) पहिल्यांदाच प्रियांका काँग्रेस कार्यकर्त्यांना सामोऱ्या गेल्या. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात (गुजरातमध्ये) भाषण केले.
आज गुजरातमधील गांधीनगर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर गांधीनगरध्येच आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी आश्वासने दिली होती. त्यापैकी दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेचे काय झाले? असा प्रश्न आपण मोदींना विचारला पाहिजे. तसेच आपण मतदारांनी बिनधास्त बोलून, सरकारला प्रश्न विचारायला हवेत,” असे आवाहनही त्यांनी केले.