लोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांच्या मतानुसार पवारांची माघार “वंचित “च्या उमेद्वारांमुळे

शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यामुळे माघार घेतल्याचे वक्तवय करताच त्यांच्या या या माघार घेण्यावर भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे कि , वंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठी ताकद निर्माण केली आहे. त्याचा धसका घेऊनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढातून माघार घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओद्वारे ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी माढातून लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. पण आज त्यांनी माढातून लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी नातवाचे (पार्थ पवार) कारण पुढे केले आहे. खरे तर पवार यांनी या वयात उमेदवारी मागे घेणे योग्य नाही. त्यांनी माढातून लढावे , असे माझे वैयक्तिक मत आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले . वंचित बहुजन आघाडीने माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाचे नेते विजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याचा धसका पवारांनी घेतला असावा म्हणूनच त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली असावी, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.