Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहशतवादप्रकरणी आता गप्प बसणार नाहीत पंतप्रधान मोदी , सीआयएसएफच्या कार्याचा गौरव

Advertisements
Advertisements
Spread the love

दहशतवादप्रकरणी आता गप्प बसणार नाही. खूप झाले. आता सहन करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे, याची आठवणही मोदींनी करून दिली आहे. ‘सीआयएसएफ’च्या ५० व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. सीआयएसएफला देश आणि औद्योगिक प्रतिष्ठानची सुरक्षेचा आधार सांगत पंतप्रधान मोदींनी सीआयएसएफचे कौतुक केले. वैभवशाली भारताच्या निर्माणात आपले अमूल्य योगदान आहे. यात महिलांचेही महत्त्वाचे स्थान आहे. गणवेश परिधान केलेल्या मुलीची संख्या सीआयएसएफमध्ये खूप मोठी आहे. त्यामुळे या मुलीसोबत मी त्यांच्या आईचेही अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले. गाझीयाबादमधील सीआयएसफ कॅम्पमधील जवानांना संबोधित करताना मोदी म्हणाले, तुमच्या हातात देशाची सुरक्षा आहे. औद्योगिक प्रतिष्ठानची सुरक्षा आहे. कोणत्याही व्हीआयपीला सुरक्षा देण्यापेक्षाही तुमचे काम मोठे आहे. तुम्ही तुमचे काम किती नम्रपणे करतात याचा मी साक्षीदार आहे. तुमचे काम खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी विदेशी देशात संकट आले त्यावेळी सीआयएसएफच्या जवानांनी जीव धोक्यात घालून त्यांना मदत केली. नेपाळ आणि हैतीमध्ये झालेल्या भूकंपात आपण केलेल्या मदतीची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती.

Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!